• A
  • A
  • A
स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतींवर रंगवले व्याकरणाचे फलक, शिक्षकाचा स्तुत्य उपक्रम

ठाणे - विद्यार्थ्यांना हसता खेळता ज्ञानार्जन करता यावे या हेतूने पार्डी ताड येथील एका शिक्षकाने चक्क स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतींवर मराठी आणि इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचे फलक रंगविले आहेत. यामुळे केवळ विद्यार्थीच नव्हे तर गावकऱ्यांनाही भाषेचा वापर करणे सोपे होऊ लागले आहे.


शालेय शिक्षणात दहावीपर्यंत व्याकरणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. व्याकरणाच्या माहिती शिवाय विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होऊ शकत नाही. तथापि शिक्षणाचे बदलते स्वरूप लक्षात घेता अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना व्याकरणाचे ज्ञान म्हणावे तसे मिळत नाही. त्यातच अभ्यास करताना पाठांतरावर अधिक भर द्यावा लागत असल्याने विद्यार्थ्यांची भाषा प्रगल्भ होताना दिसत नाही. पार्डी ताड येथील गोविंद विद्यालयाचे शिक्षक बाळकृष्ण राऊत यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना ही अडचण येऊ नये यासाठी अफलातून आणि स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे.
हेही वाचा - पाथरीत शेतकऱ्यांच्या मदतीला 'मैत्र जिवांचे ग्रुपचा' हात, बंधारा कामाला सुरुवात
बाळकृष्ण यांनी स्वखर्चाने गावातील घरांच्या भिंतीवर इंग्रजी आणि मराठी व्याकरण याची माहिती देणारे फलक रंगविले आहेत. यात विभक्तीचे प्रत्यय, संधि, विग्रह, समास, अलंकार आदींचे स्पष्ट शब्दांतील रकाने त्यांनी मांडले आहेत. स्वतःच्या शालेय जीवनात व्याकरणाचा वापर करताना आलेल्या अडचणी पासून त्यांनी बोध घेतला आणि ही समस्या इतरांना येऊ नये यासाठी त्यांनी हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES