• A
  • A
  • A
सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचा शुभारंभ

सिंधुदुर्ग - राष्ट्रीय छात्र सेनेच्या ५८ महाराष्ट्र बटालीयनचा शुक्रवारी दिमाखदार सोहळ्याने शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कार्यालयाचे उद्घाटनदेखील करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेचे अतिरिक्त महासंचालक गजेंद्र प्रसाद यांची या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभली. त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने बटालियनचा शुभारंभ करण्यात आला.


राष्ट्रीय छात्र सेनेच्या रूपाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, ब्रिगेडीयर आर. बी. डोंगरा, कर्नल देवेन भारद्वाज, लेफ्टनंट कर्नल सी.पी. उन्नीकृष्णन आदी उपस्थित होते.
हेही वाचा - जमिनीच्या वादातून खून; उपसरपंचासह चौघांवर गुन्हा दाखल!
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय छात्र सेना स्थापन करण्यात आली आहे. ही भारताच्या संरक्षण व्यवस्थेची तिसरी महत्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. सिंधुदुर्ग येथे कार्यान्वित झालेले कार्यालय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग तर पुढे रत्नागिरी जिल्ह्याचा या बटालियनमध्ये समावेश केला जाणार आहे. विशेष म्हणजे ३ हजार ५०० एवढी या नव्या बटालियनची क्षमता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शालेय आणि महाविद्यालयीन असंख्य विद्यार्थ्यांना या बटालियनचा लाभ घेणे शक्य होणार आहे.

हेही वाचा- 'स्टोन आर्ट्स'च्या माध्यमातून दगडांना बोलकी करणारी कलाकार
सिंधुदुर्गनगरीतील क्रीडा संकुलाच्या बाजूस असलेल्या इमारतीमध्ये राष्ट्रीय छात्र सेनेचे कार्यालय सुरू करण्यात आले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES