• A
  • A
  • A
देवगड येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वन विभागाकडून सुटका

सिंधुदु्र्ग - देवगड तालुक्यातील पोयरे मश्वी येथे बिबट्या विहिरीत पडल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर ही बाब तत्काळ वनविभागाला कळवण्यात आले. माहिती मिळताच वनविभागाने घटनास्थळी पोहोचून साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले.

हेही वाचा - भाजपकडून ३ मार्चला राज्यात मोटरसायकल...
शिवराम मयेकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा बिबट्या पडला होता. दरम्यान, पाण्याचा पंप सुरू करुनही शेतीला पाणी येत नसल्याने विहिरीत डोकावून पहाण्यासाठी गेलेल्या राजू मयेकर यांना ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ याबाबत वनविभागाला कळवले. वनविभागाने घटनास्थळी पोहोचून विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीत पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

हेही वाचा - अभिनेता अमोल कोल्हेंच्या राष्ट्रवादी काँग्रेस...
यावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सर्जेराव सोनावडेकर, वनपाल वि.रा. मुळे, शशिकांत साटम, डि. के. पार्सेकर, वनरक्षक एस. डी. बडदे, आबासाहेब परीट, अ. ही. राठोड यांसह अन्य वन्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, बिबट्याला पाहण्यासाठी उसळलेल्या गर्दीला आवरताना वनविभाग कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. पाणीही जास्त नसलेल्या साधारण १० फूट खोलीच्या विहिरीत बिबट्या विहिरीतल्या खोबणीत जाऊन राहिल्याने त्याला बाहेर काढणे कठीण बनले. त्यात बघ्यांच्या गर्दीमुळे बिबट्याला पिंजऱ्यात पकडताना त्रास होत होता.
शेवटी वनविभाग कर्मचाऱ्यांनी लोकांना हुसकावून लावत ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद केले. सदर बिबट्या हा मादी जातीचा आहे. त्याची पुर्ण वाढ झालेली असून अंदाजे ४ वर्षांची आहे. वैद्यकीय तपासणीनंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल सोनावडेकर यांनी दिली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES