• A
  • A
  • A
सिंधुदुर्गात बंदी असूनही बैलांच्या झुंजी, पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

सिंधुदुर्ग - बैल झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना जिल्ह्यात बेकायदेशीर बैलांच्या झुंजी खेळवल्या जात आहेत. वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यात याचे प्रमाण सर्वाधिक असून याठिकाणी झुंजीचे आयोजन सुरू आहे. विशेष म्हणजे या झुंजीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सट्टेबाजार सुरू आहे. मात्र, पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप प्राणी मित्र करीत आहेत.


हेही वाचा - आदिवासी महिलांचा पाण्यासाठी हंडा मोर्चा
देशात जलीकट्टू, बैल शर्यत, बैल झुंज आणि बैलांच्या छळावर बंदी आहे. २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी लागू केली होती. बंदीनंतर अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने बैलांचे हे बेकायदेशीर खेळ आयोजित केले जात आहेत. तळकोकणात देखील अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे झुंजी आयोजित केल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे बैल झुंजींच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी सुरू आहे. यामध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा संशय प्राणी मित्र व्यक्त करत आहेत. सिंधुदुर्गातील वेंगुर्ला आणि कुडाळ तालुक्यात सर्रासपणे बेकायदेशीर झुंजीचे आयोजन केले जाते. राजकारणी आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादानेच हे बेकायदेशीर खेळ सुरू असून यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्राणी मित्र किशोर वरक यांनी केली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES