• A
  • A
  • A
रत्नागिरीतून स्वाभिमानचे निलेश राणे उमेदवार; भाजपच्या अडचणीत वाढ

मुंबई - स्वाभिमान पक्षाच्या नारायण राणे यांनी लोकसभेच्या रिंगणात आपला पहिला उमेदवार जाहीर केला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शुक्रवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पहिला मेळावा घेणयाात आला. यावेळी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांना रत्नागिरी - सिंधुदूर्ग मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. राणे यांच्या या घोषणेने राज्यात भाजपच्या पुढे अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.वाचा - धुळेकरांची तपश्चर्या फळास! असा असेल मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग

सेना-भाजपाची युती लोकसभेच्या निवडणुकीत होण्याच्या मार्गावर असताना राणे आपल्या स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून रत्नागिरीसह राज्यात उमेदवार उभे करणार असल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. राणे यांनी शुक्रवारी आपल्या भाषणात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत मराठी माणसाचा टक्का कमी होण्यासाठी सेनेला जबाबदार धरले.


वांद्रे येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. यात मनसे कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अजित अडसूळे आणि त्यांचे अनेक सहकारी, भारतीय कामगार सेनेचे संजय मोहिते, परशुराम आंग्रे, तुषार कांबळे, विशाल कांबळे यांच्यासह अनेकांचा समावेश होता. तर आज राणे यांनी मुंबई वाहतूक स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नावेद खलिफे यांचे नाव जाहीर केले.

वाचा -पंतप्रधान आज धुळे दौऱ्यावर, विविध प्रकल्पांचे भूमिपूजनCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES