• A
  • A
  • A
सिंधुदुर्गमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्याचे जेलभरो आंदोलन

सिंधुदुर्ग - अंगणवाडी कर्मचारी सभेच्या वतीने मंगळवारी सिंधुदुर्गात जेलभरो आंदोलन करण्यात आले. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या. दरम्यान आश्वासनांची अंमलबजावणी होत नसल्यामुळे आंदोलकांकडून सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


हेही वाचा - बहुचर्चित चिपी विमानतळ या महिन्यात सुरू होणार, पालकमंत्री केसरकर यांचे संकेत
राज्यभर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी जेलभरो आंदोलन छेडले आहे. सिंधुदुर्गात देखील जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरले होते. सुरुवातीला सिंधुदुर्ग ओरोस येथील रवळनाथ मंदिरात जिल्हाभरातून शेकडोच्या संख्येने आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस एकत्र जमल्या. त्यानंतर जमलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आपल्याला अटक करून घेत जेल भरो केला.

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून महिलांना 'सॅनिटरी नॅपकिन'चे वाटप
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत. यात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ व्हावी, गेल्या सात महिन्यापासून रखडलेले मानधन मिळावे, २०१५ पासूनचा प्रवासभत्ता त्वरित अदा व्हावा. या प्रमुख मागण्या आहेत. दरम्यान वेळोवेळी आंदोलन करून सुद्धा प्रश्न मार्गी लागत नसल्याने कर्मचारी महिला चांगल्याच आक्रमक झालेल्या दिसल्या. त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES