• A
  • A
  • A
हळदी-कुंकूच्या माध्यमातून मदतीचा हात; कणकवलीत महिलांचा कौतुकास्पद उपक्रम

सिंधुदुर्ग - मकर संक्रांतीनंतर अनेक ठिकाणी महिला वर्गाकडून सामूहिक हळदी-कुंकू समारंभ साजरे केले जातात. मात्र, कणकवलीतील काही महिलांनी यातून एक वेगळा आदर्श निर्माण केला. या महिलांनी हळदी-कुंकू समारंभातुन जमलेल्या रकमेतून आश्रमाला मदतीचा हात देऊ केला आहे. कणकवली शहरातील शिवशक्ती नगरातील रहिवाशांनी हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे.


हेही वाचा - बहुचर्चित चिपी विमानतळ या महिन्यात सुरू होणार, पालकमंत्री केसरकर यांचे संकेत
जमलेली रोख रक्कम, घरातील कपडे, भांडी, धान्य अशा विविध गृहपयोगी वस्तू दान करण्याचा संकल्प या महिलांनी केला होता. हळदी-कुंकू समारंभातून जमलेल्या पैशातून मंगळवारी संविता आश्रमाला या विविध वस्तू दान करण्यात आल्या. जीवन आनंद या सामाजिक संस्थेमार्फत पणदूर येथे संविता आश्रम चालविला जातो. समाजातील असहाय्य, निराधार, मतिमंद अशा समाजाने नाकारलेल्या लोकांसाठी तो एक भक्कम आधार ठरला आहे.


लोकाश्रयाच्या जीवावर ही संस्था आजवर निराधारांची सेवा करत आहे. आश्रमाचे सेवक संदीप परब आणि त्यांचे सर्व सहकारी मनोभावे निराधारांना आधार देत आहेत. अगदी ९० वर्षापासून १० वर्षे वयाच्या महिला, मुली, मुले येथे आहेत. अशा निराधारांना आधार देण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे, तो कणकवली शहरातील शिवशक्ती नगरातील महिलांनी.


हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून महिलांना 'सॅनिटरी नॅपकिन'चे वाटप

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES