• A
  • A
  • A
बहुचर्चित चिपी विमानतळ या महिन्यात सुरू होणार, पालकमंत्री केसरकर यांचे संकेत

सिंधुदुर्ग - बहुचर्चित चिपी विमानतळ या महिन्यात सुरू होणार, असे संकेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. येत्या १५ दिवसात मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिपी विमानतळ सेवा नागरिकांसाठी खुली करणार, अशी माहिती त्यांनी दिली. चिपी विमानतळ आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी ते बोलत होते.


सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ राजकीय श्रेयवादामुळे चर्चेत आले होते. गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला विमानतळावर चाचणी विमान उतरले खरे. मात्र, प्रत्यक्ष विमानसेवा सुरू होण्यामध्ये तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे विमानतळ सुरू होत नव्हते. अखेर येत्या १५ दिवसात चिपी विमानतळ सुरू होण्याचे संकेत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.
हेही वाचा - ५ वर्षात रेल्वे अपघातात ४१९ प्रवाशांचा बळी
संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन असल्याने केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी आयोजित केलेली दिल्लीतील बैठक रद्द करण्यात आली. मात्र, येत्या १५ दिवसात सर्व वीज आणि अन्य कामे पूर्ण केली जाणार आहेत. लवकरच नाईट लॅडिंग विमानसेवा ही सुरू करण्यात येईल, असे आश्वासन केसरकर यांनी यावेळी दिले.
वेंगुर्ले येथे होत असलेल्या डोमेस्टिक विमानतळाबाबत आयआरबी अधिकारी आणि संबंधित विभागाचे अधिकारी यांची बैठक चिपी विमानतळ सभागृहात पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित केली होती. यावेळी आय. आर. बी. चे अधिकारी जयंत डागरे, किरण कुमार, राजेश लोणकर, योगेश मेत्रे, एमआयडीसीचे अधिकारी रेवणकर, प्रांताधिकारी सुशांत खाडेकर, तहसीलदार शरद गोसावी, दूरसंचार विभागचे खवणेकर, वीज वितरणचे अधिकारी कांबळे, सा. बां. चे देसाई तसेच संबंधित विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES