• A
  • A
  • A
वेंगुर्ल्यात मच्छिमाराच्या जाळ्यात सापडला तब्बल १२ फुटांचा शार्क मासा

सिंधुदुर्ग - वेंगुर्लेतील एका मच्छिमाराच्या जाळ्यात तब्बल १२ फुटी मोरी मासा (शार्क फिश) सापडला. या ठिकाणी पहिल्यांदाच एवढा मोठा मोरी मासा सापडल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या माशाला सुमारे 75 हजार रुपये एवढा विक्रमी दर मिळाला आहे.


वेंगुर्लेतील शिरोडा केरवाडी येथील संदीप चोडणकर हे नेहमी प्रमाणेच बुधवारी सायंकाळी मासे मारीसाठी गेले होते. खोल समुद्रात मासेमारी करताना त्यांच्या जाळ्याला भला मोठा मोरी मासा (शार्क फिश) लागला. या माशाचे वजन तब्बल ३४८ किलो असून लांबी १२ फूट आहे. गुरुवारी सकाळी हा मासा केरवाडी किनाऱ्यावर आणण्यात आला. प्रथमच एवढा अजस्त्र मोरी मासा मच्छिमारी जाळ्यात सापडल्याने तो पाहण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली.

वाचा -
आमच्या नादाला लागाल तर ठाकरेंची अब्रु चव्हाट्यावर आणू - निलेश राणे
हा भलामोठा मोरी मासा लिलावात एका व्यापाऱ्याने खरेदी केला. या महाकाय मोरी माशाला तब्बल ७५ हजार रुपये एवढा विक्रमी दर मिळाला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES