• A
  • A
  • A
पहले कोकण के मंदिर फिर सरकार...! नाणारच्या विरोधासाठी नितेश राणेंची प्रार्थना

सिंधुदुर्ग - नाणार येथील प्रस्तावित ग्रीन रिफायनरी विरोधात बुधवारी देवगड मध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने हे हटके आंदोलन केले. यावेळी पहले कोकण के मंदिर फिर सरकार अशी घोषणा स्वाभिमानी पक्षाने दिली. या आंदोलनात देवगड मधील गिर्ये, रामेश्वर, विजयदुर्ग गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


आंदोलनाचा भाग म्हणून गिर्ये-रामेश्वर मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच या भागातील मशीद आणि चर्चमध्ये जावून देखील नाणार रद्द होण्यासाठी ग्रामस्थांनी प्रार्थना केली. देवगड गिर्ये रामेश्वर परिसरात एकूण ३२ धार्मिक स्थळे आहेत. त्यात २३ मंदिरे, ७ मशिद तर दोन चर्च आहेत. ही सर्व धार्मिक स्थळे नाणार ग्रीन रिफायनरी मुळे उद्ध्वस्त होणार आहेत. त्याशिवाय येथील ग्रामस्थांची घरे, आंबा बागायती, मच्छीमारी व्यवसाय धोक्यात येणार आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा ह्या प्रकल्पाला टोकाचा विरोध आहे. मात्र या निमित्ताने एरव्ही विविध मार्गाने प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्वाभिमानचा भावनिक एल्गार पहायला मिळाला.
हेही वाचा - हापूस फक्त आमचोच! नोंदणी न करताच नाव वापरल्यास कारवाई

सत्ताधारी शिवसेना सुरुवाती पासूनच नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिकेत आहे. त्यामुळे नितेश राणेंनी या आंदोलनाच्या निमित्ताने शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. शिवसेनेने राम मंदिरपेक्षा कोकण भूमी वाचवण्यासाठी प्रयत्न करावा. ज्या कोकणभुमीने शिवसेनाला आमदार, खासदार, मंञी दिले, ती शिवसेना सत्तेत असुनही नाणार रद्द करू शकत नाही. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे अयोध्येला जावून राममंदीर होण्यासाठी महाआरती करतात. कोकणातील मंदीरे उद्ध्वस्त होतायत. ती वाचवण्यासाठी काही करायचे नाही आणि अयोध्येत जावून राममंदीर बांधण्याची घोषणा करायची ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असा टोलाही नितेश यांनी शिवसेनेला लगावला.

या आंदोलनात समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, जि.प.सदस्य सावी लोके, जि.प.सदस्य अनघा राणे, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, संदीप मेस्त्री, पं.स. सदस्य प्रदीप तळेकर, नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, उपनगराध्यक्ष संजय तारकर, सरपंच विनोद सुके, रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश केळकर, देवगड महिला तालुकध्यक्षा प्रीती वाडेकर, तालुकाध्यक्ष डॉ. अमोल तेली, संदीप साटम, विधानसभा मतदार संघ अध्यक्ष अमित साटम आदी स्वाभिमान पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES