• A
  • A
  • A
मालवणजवळील दांडी समुद्रकिनारी रंगला राष्ट्रीय पतंग महोत्सव

सिंधुदुर्ग - मालवण येथील दांडी समुद्र किनारी शनिवारी राष्ट्रीय पतंग महोत्सव पार पडला. शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवात राजकोट, सुरत, केरळ, पाचगणीसह स्थानिक पतंगप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. दरम्यान तळकोकणातील या भव्य पतंग महोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली.


हेही वाचा - डिझेलच्या किमतीत वाढ; मुंबई आणि दिल्लीमध्ये १० पैशांनी वधारले
रे-फिश, डॉरेमॉन, टायगर, कॅटफिश, तिरंगा अशा विविध रंगाचे आणि आकाराचे असंख्य पतंग अवकाशात तरंगताना यावेळी पाहायला मिळाले. या महोत्सवात बच्चे कंपनी सोबतच मोठ्यांनी देखील पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. स्वतः आमदार वैभव नाईक यांनी देखील सहकुटुंब पतंग उडवण्याचा आनंद लुटला.
मालवणात देशी-विदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. त्यांना या पतंग महोत्सवातून आनंद घेता यावा. तसेच मालवण-दांडी बिचचे नाव विदेशातही प्रसिद्धीस यावे, या हेतूने हा पतंग महोत्सव आयोजित केला आहे. या वर्षापासून महोत्सवाची सुरूवात करण्यात आली आहे. दरवर्षी २६ जानेवारीला अशाच प्रकारचा भव्य पतंग महोत्सव घेण्यात येणार असल्याचे वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - दिव्यांग सैनिकांसाठी खूशखबर! १८ हजार पेन्शनला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES