• A
  • A
  • A
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत विद्यार्थ्यांनी साकारला सिंधुदुर्गचा मानवी नकाशा!

सिंधुदुर्ग - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत सिंधुदुर्गमध्ये शनिवारी जिल्ह्याचा भव्य मानवी नकाशा साकारण्यात आला. जिल्हावासियांनी ओरोस येथील डॉन बोस्को शाळेच्या मैदानावर हा ऐतिहासिक क्षण अनुभवला. या मानवी नकाशात जवळपास २ हजार ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते.

विद्यार्थ्यांनी साकारलेला सिंधुदुर्गचा मानवी नकाशा


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली, देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग आदी ८ तालुके या मानवी नकाशात वेगवेगळ्या रंगांमधून दाखवण्यात आले. विद्यार्थी हातामध्ये राष्ट्रध्वज घेऊन या मानवी नकाशात सामील झाले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मानवी नकाशाचे दृश्य अधिकच विहंगम आणि तिरंगामय दिसत होते. दरम्यान सोमस्थ अकादमी सिंधुदुर्ग आणि डॉन बॉस्को स्कूल व ज्युनियर कॉलेज ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.

विशेष म्हणजे या मानवी नकाशाची ग्लोबल बूक ऑफ रेकोर्डने दखल घेत याची नोंद आपल्या रेकॉर्डमध्ये केली आहे. तशी घोषणाच यावेळी ग्लोबल बूक ऑफ रेकोर्डचे मारीयो गोम्स यांनी केली. सोबतच एशिया पेसिफिक रेकॉर्डमध्येही या मानवी नकाशाची नोंद झाल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच अशाप्रकारे सिंधुदुर्गचा मानवी नकाशा साकारण्यात आला. तो पहाण्यासाठी खासदार नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी विशेष उपस्थिती लावली होती.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES