• A
  • A
  • A
सिंधुदुर्गात पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण

सिंधुदुर्ग - चांदा ते बांदा, फळझाड लागवड या योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या आर्थिक विकासास चालना मिळत आहे. यासाठीच कृषि यांत्रिकीकरण, पशुसंवर्धनाच्या कुक्कुट पालन, शेळी-मेंढी पालन, नौका यांत्रिकीकरण, केज फिशिंग आदी योजनांचा लाभ जिल्हावासियांनी घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले. ते ओरोस येथील पोलीस परेड ग्राऊंडवर प्रजासत्ताक दिनाच्या ६९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात बोलत होते.


हेही वाचा-सिंधुदुर्ग जि.प.कडून महिलांना 'सॅनिटरी नॅपकिन'चे वाटप
यावेळी बोलताना केसरकर म्हणाले, लोकशाही सदृढ करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेविषयी सतत शिक्षणाद्वारे जागरुकता आवश्यक आहे. २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. शासनाने नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये चांदा ते बांदा सारख्या अभिनव व महत्वकांक्षी योजनेचाही समावेश आहे. जलयुक्त शिवार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, फळबाग लागवड या सारख्या योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले.
ध्वजारोहणानंतर, पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी व पोलीस दलातील उत्कृष्ट खेळाडू पोलीस कॉन्सटेबल राहूल काळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर डॉन बॉस्को हायस्कूलच्या स्काऊटच्या विद्यार्थ्यांचा सुवर्ण पदक मिळवल्याबद्दल सन्मान करण्यात आला. तर डॉन बॉस्को हायस्कूलच्या गाईडचाही सुवर्ण व रौप्य पदक पटकावल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला. त्यानंतर पोलीस निरीक्षक कविता फडतरे यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस प्लाटन क्रमांक १, २, ३, होमगार्ड पुरुष व महिला पथक, आंबोली सैनिक स्कूलचे पथक व स्काऊड व गाईड पथक, जिल्हा पोलीस बँड पथक, श्वान पथक, वज्र, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक यांनी पालकमंत्र्यांना मानवंदना दिली.
तसेच जिल्हा श्वान पथकाने यावेळी प्रात्यक्षिक सादर केली. डॉन बॉस्को हायस्कूलच्या ढोल ताशा पथकाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा व त्यांचे चरित्र यावर अधारित कार्यक्रम सादर केला. समाजकार्य महाविद्यालय कुडाळ यांनी 'जागो ग्राहक जागो' हे पथनाट्य सादर केले. तर कार्यक्रमाचा समारोप बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर संगीतमय कार्यक्रमाने झाला.
हेही वाचा-'रात्रीस खेळ चाले'; अशोक चव्हाणांचा हॅकरच्या आरोपानंतर भाजपला टोला !
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाअधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी, अप्पर पोलीस अधिक्षक निमित गोयल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, आमदार वैभव नाईक, अतुल काळसेकर यांच्यासह जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक व शालेय विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा-मुंबई-गोवा महामार्गावर बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात; १ ठार, एक गंभीरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES