• A
  • A
  • A
सिंधुदुर्ग जि.प.कडून महिलांना 'सॅनिटरी नॅपकिन'चे वाटप

सिंधुदुर्ग - जिल्हा परिषदने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत हळदी कुंक समारंभाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने महिलांना वाण म्हणून 'सॅनिटरी नॅपकिन'चे वाटप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सुमारे ४ लाख नॅपकिन वाटपाचे उद्दिष्ट ठेऊन हा अनोखा उपक्रम हाती घेतला आला आहे. मात्र, हिंदू जनजागरण समितीच्या रगरागिनी संघटनेने याला तीव्र विरोध दर्शवला आहे.


हेही वाचा - तळकोकणातील समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक जेलीफिश, मच्छिमारांच्या डोकेदुखीत वाढ
सिंधुदुर्ग जि.प.चे उत्कर्षा प्लस या उपक्रमांतर्गत सॅनिटरी नॅपकिन वाटप सुरू आहे. यासाठी जिल्हाभरात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायत आणि पंचायत समित्यांमध्ये हा कार्यक्रम घेतला जात आहे. विशेष करून ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. या हळदी कुंकू समारंभात वाण म्हणून सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात येत आहे. प्रशासनाकडून स्त्रियांमध्ये आरोग्य विषयक जनजागृतीसाठी हा पुढाकार घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

विशेष करून राज्यात फक्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हा अनोखा उपक्रम राबवत आहे. मात्र, हिंदू संघटनांनी हळदी कुंकू समारंभात वाण म्हणून हे सॅनिटरीचा उपयोग होत असल्याने याला कडाडून विरोध केला आहे. यासाठी हिंदू जनजागृती समितीच्या रणरागिणी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर प्रशासना सोबतच अनेक स्तरातून जिल्हा परिषद प्रशासनाच्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा - 'रात्रीस खेळ चाले'; अशोक चव्हाणांचा हॅकरच्या आरोपानंतर भाजपला टोला !


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES