• A
  • A
  • A
तळकोकणातील समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक जेलीफिश, मच्छिमारांच्या डोकेदुखीत वाढ

सिंधुदुर्ग - तळकोकणातील समुद्रकिनारी सध्या धोकादायक जेलीफिश आल्या आहेत. विशेष म्हणजे हे जेलीफिश मच्छिमारांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. जेलिफिशमुळे कमी मासळी सोबतच मच्छिमारी जाळी तुटल्याने नुकसान होत आहे. तर दुसरीकडे पर्यटकांनादेखील काळजी घ्यावी लागणार आहे.


वाचा - ओखी वादळानंतर मच्छीमारांसमोर जेलिफिशचे संकट
गेल्या ४ ते ५ वर्षांपासून कोकणातील समुद्र किनारी जेलीफिश येण्याचे प्रमाण वाढले आहे. समुद्राच्या गर्भातील वातावरण बदलामुळे हे समुद्रीजीव समुद्र किनारी येत असतात. या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात हे मासे समुद्र किनारी तसेच समुद्रात आढळतात. मोठ्या संख्येने हे जीव मच्छिमारी जाळ्यात येत असतात. त्यामुळे मच्छिमारांना मासळी ऐवजी जाळ्यात अनेकदा जेलीफिश मिळतात.

वाचा - गणेश विसर्जन: चौपाटीवर स्ट्रिंग रे, ब्लु जेलिफिशचा धोका; सावधानतेचे...
परिणामी जाळ्यात मासळी मिळण्याचे प्रमाण घटते. जाळ्यातून जेलीफिश सोडवताना जाळीदेखील तुटते. त्यामुळे मच्छिमारांसाठी ही जेलीफिश डोकेदुखी ठरत आहेत. विशेष म्हणजे या जेलिफिशना स्पर्श झाल्यास त्वचेची फार जळजळ होते. त्यामुळे या धोकादायक जेलीफिशपासून बचावासाठी पर्यटकांनी काळजी घेण्याची गरज आहे.
वाचा - कोकणच्या किनाऱ्यांवर जेलिफिशचा मच्छीमारांना त्रास; सावधानता...

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES