• A
  • A
  • A
'रात्रीस खेळ चाले'; अशोक चव्हाणांचा हॅकरच्या आरोपानंतर भाजपला टोला !

सिंधुदुर्ग - आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद शुजा याने सोमवारी भारतीय राजकारणात खळबळ माजवणारा गौप्यस्फोट केला आहे. त्यानंतर विरोधकांना मात्र सत्ताधाऱ्यांविरोधात आयतेच कोलीत मिळाले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी भाजपने २०१४ ला रात्रीस खेळ केला म्हणत टोला लगावला. तसेच २०१९ च्या निवडणुकीत देखील रात्रीस खेळ होऊ शकेल, असे सांगत कार्यकर्त्यांना सजग राहण्याचे आवाहन केले.


काँग्रेसची अखेरच्या टप्प्यातील जनसंघर्ष यात्रा कोकणात पोहचली आहे. सिंधुदुर्गातील सावंतवाडी येथे आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
सुरुवातीपासूनच विरोधकांकडून अनेकदा ईव्हीएम हॅकिंगचा आरोप झाला आहे. तसेच भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या अपघाती मृत्यूवर देखील शंका उपस्थित झाल्या होत्या. यावर अंतरराष्ट्रीय हॅकरने पत्रकार परिषद घेत नव्याने आरोप केले. त्यामुळे या दोन्ही चर्चांना नव्याने उधाण आले आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES