• A
  • A
  • A
राहुल गांधी नांदेडमधून निवडणूक लढवणार? अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

नांदेड - राहुल गांधी नांदेड लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याच्या शक्यतेची चर्चा आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी देखील राहुल गांधी कुठूनही निवडणूक लढले तरी सर्व नेते एकजुटीने काम करतील, असे म्हणत एक प्रकारे या चर्चांना दुजोरा दिला आहे. काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेनिमित्ताने सावंतवाडी येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.


नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. सध्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या मतदार संघातून नेतृत्व करत आहेत. तसेच आजवरचा इतिहास पाहाता काँग्रेससाठी सर्वात सुरक्षित मतदार संघ देखील आहे. येथून मागील १० लोकसभा निवडणुकीत तब्बल ८ वेळा काँग्रेसने बाजी मारलेली आहे. मोदींप्रमाणेच काँग्रेस कार्याध्यक्ष राहुल गांधी देखील २ वेगवेगळ्या मतदार संघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

वाचा- बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला केला रिकामा, महापौर राणीबागेतील बंगल्यात

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES