• A
  • A
  • A
मुंबई-गोवा महामार्गावर बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात; १ ठार, एक गंभीर

सिंधुदुर्ग - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे साडे पाचच्या सुमारास आराम बस आणि मालवाहू ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये आराम बस ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा अपघात घडला. यात आराम बसचा चालक जागीच ठार झाला. तर क्लीनर गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही वाहने गोव्याच्या दिशेने जात होती. दाट धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

घटनास्थळ


हेही वाचा - मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीची एसटीला धडक; १ ठार, ३ गंभीर
मुंबईहून गोव्याकडे भरधाव वेगाने निघालेली एक खासगी आराम बस मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना कासार्डे नजीक पुढे चाललेल्या ट्रकला मागाहून धडकली. धुके असल्याने मालवाहू ट्रक हळू चालत होता. तर आराम बस वेगाने असल्याने तिचे नियंत्रण सुटले. या अपघातामध्ये आराम बसचा चालक आणि क्लीनर गंभीर जखमी झाले. या दोघांनाही उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले होते. यात बसचा चालक मृत झाल्याचे वैद्यकिय अधिकार्‍यांनी स्पष्ट केले तर क्लिनरवर उपचार सुरू आहेत. मात्र, अपघातात बसमधील प्रवाशांना सुदैवाने फारश्या दुखापती झालेल्या नाहीत.
हेही वाचा - भिवंडीजवळ कंटेनर पलटला; रस्त्यावर पावडर पसरल्याने वाहतुकीची कोंडी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES