• A
  • A
  • A
भांडुपकरांना 'दशावतार' नाट्य महोत्सवाची मेजवानी

मुंबई - सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य आयोजित दशावतार नाट्य महोत्सव २०१८-१९ भांडुप येथे होत आहे. हा नाट्य मोहत्सव १७ ते २३ जानेवारी या काळात रोज संध्याकाळी ६.३० वाजता कोकण नगर, भांडुप येथे संपन्न होत आहे.


हेही वाचा - शेतकरी वडिलांचे हाल पाहून मुलीने बनविले फवारणी यंत्र
कोकणातील या अती प्राचीन लोककलेची जोपासना व्हावी यासाठी दशावतार नाट्य महोत्सव आयोजन केले जाते या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष आहे. १७ ते २३ जानेवारी चालणाऱ्या यानाट्य मोहत्सवात नाटक उलुक तीर्थ, पुनर्जन्म, मृत्युंजय दैवयोग, विधीचक्र, इंद्रसेन सत्त्वपरीक्षा, वज्रकाशीश्वर हे सर्व नाटके नाट्यप्रेमींसाठी मीनाताई ठाकरे मैदान कोकण नगर भांडुप पश्चिम येथे दाखवण्यात येत आहेत.

गेल्या वर्षी हा नाट्य महोत्सव चिपळूण येथे आयोजीत करण्यात आला होता. अशी माहिती या दशावतार नाट्य शिफारस समिती सदस्य तुषार सोनू नाईक यांनी सांगितले. ते पुढे बोलताना सांगतात की, शासनाकडून हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. विविध प्रांतातील लोकांना दशावतार नाट्य लोककलेची ओळख व्हावी यासाठी हा उपक्रम विविध ठिकाणी घेण्याचे योजिले जात आहे.


हेही वाचा - दुष्काळात 'कृषी' खात्याचे तीन-तेरा; पूर्णवेळ मंत्री, सचिवाअभावी कृषी विभागाची परवड
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES