• A
  • A
  • A
मोबाईल टॉवरसाठी युवकाचे हेवाळेत शोलेस्टाईल आंदोलन

सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यातील हेवाळे येथे मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने ग्रामस्थांनी बुधवारी उपोषण छेडले. या गावाजवळील तेरवन मेढे येथे बीएसएनएल कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरची फ्रेक्वेन्सी वाढवावी आणि संपूर्ण हेवाळे पंचक्रोशीत रेंज विस्तारित करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


हेही वाचा- भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार लोकसभा लढवण्यास इच्छुक!
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते न आल्याने मायकल लोबो नावाच्या आंदोलनकर्त्या युवकाने चक्क शोले स्टाईल आंदोलनाचा पवित्रा घेतला. मायकल जवळच्याच मोबाईल टॉवरवर ५० ते ६० फूट उंच चढला. त्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा- वेंगुर्ल्यात सागरी संशोधन केंद्र उभारणीस ४ एकर जागा देणार - पालकमंत्री केसरकर
दरम्यान, दोडामार्ग पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांनी मायकलला वारंवार खाली येण्याची विनंती केली. मात्र, बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी शब्द पाळला नसल्याने हे आंदोलन करावे लागत असल्याचे सांगत मायकलने टॉवरवरून खाली उतरण्यास नकार दिला. अखेर थोपटे यांनी बीएसएनलच्या अधिकाऱयांना चर्चेसाठी आणण्याचे आश्वासन दिल्यानंतर मायकल टॉवरवरुन खाली उतरला. मात्र, ग्रामस्थांचे आंदोलन अद्याप सुरूच आहे.

हेही वाचा- ....आता राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, निलेश राणेंचे ट्विट


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES