• A
  • A
  • A
भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार लोकसभा लढवण्यास इच्छुक!

सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू हेच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजपचे उमेद्वार असणार, हे जवळपास निश्चित आहे. मात्र प्रभूंनी नकार दिल्यास आपण ही जागा लढवण्यास इच्छुक असल्याचे प्रमोद जठार यांनी सांगितले आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत

प्रमोद जठार


हेही वाचा - थंडीपासून आंबा, काजू पिकाच्या संरक्षणासाठी सल्ला

सर्वच पक्षांकडून आगामी निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. युती होते की नाही याचा पेच देखील आहे. मात्र सिंधुदुर्गातील भाजप कार्यकर्ते स्वबळाच्या तयारीला लागले आहेत. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार निश्चित मानले जात आहे.
नारायण राणेंना विरोध करण्यात आघाडीवर असलेले जठार फक्त विरोधासाठीच लोकसभेच्या मैदानात उतरण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. तर जठार इच्छुक असताना प्रभूंना उमेदवारी दिली गेल्यास जिल्हा भाजपमध्ये कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राणेंचे पुत्र नीतेश यांनी कणकवली मतदार संघातून जठारांचा पराभव केला होता. त्यामुळे विधानसभेऐवजी लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरून जठार काय साध्य करू पहात आहेत? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.

हेही वाचा - वेंगुर्ल्यात सागरी संशोधन केंद्र उभारणीस ४ एकर जागा देणार - पालकमंत्री केसरकरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES