• A
  • A
  • A
थंडीपासून आंबा, काजू पिकाच्या संरक्षणासाठी सल्ला

सिंधुदुर्ग - कोकणात गेले काही दिवस थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. तापमानाचा पारा देखील १२ अंशांपेक्षा खाली घसरला आहे. याचा फटका हा आंबा आणि काजू पिकाला बसत आहे. या थंडीपासून संरक्षणासाठी नियंत्रणाचे उपाय हे दोन्ही पिकांनी फायदेशीर ठरू शकतात. पिकांची योग्य काळची घेतल्यास चांगले उत्पन्न मिळू शकते.


हेही वाचा - ....आता राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, निलेश राणेंचे ट्विट
काजू पिकासाठी वाढती थंडी चिंतेचा विषय बनत आहे. यासाठी पूर्व दक्षतेचे आणि प्रत्यक्ष नियंत्रणाचे उपाय गरजेचे आहे. या दोन्ही पिकांसाठी फायदेशीर ठरू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. वाढत्या थंडीत कशा प्रकारे आपल्या आंबा आणि काजू बागेचे संरक्षण करता येईल. याचा सल्ला मुळदेचे ग्रामीण कृषी हवामान सेवेचे शास्त्रज्ञ डॉ. यशवंत मुठाळ यांनी दिले.
डॉ. मुठाळ म्हणाले, थंडीच्या वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होते यामुळे पिकांच्या संरक्षणासाठी शेवरी, शेवगा यासारखे झाडे लावली पाहिजे. पिकांमध्ये आंतरपीक घेऊन तापमान वाढविले पाहिजे. तापमान वाढविण्यासाठी शेतात चार पाच ठिकाणी ओला पालापाचेळा किंवा वाळा पालापाचोळा टाकून शेकोटी करावी जेणेकरून तापमानात वाढ होईल, असा सल्ला त्यांनी दिला.
हेही वाचा - तळकोकणात थंडीचा जोर अधिकच वाढला!

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES