• A
  • A
  • A
....आता राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, निलेश राणेंचे ट्विट

मुंबई - बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पार्टी एकत्र आल्यांनतर राजकीय चर्चेला उधाण आलेले असताना काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नसल्याची टिप्पणी निलेश यांनी ट्विटरवरून केली आहे.

संग्रहित छायाचित्र


हेही वाचा - मायावती-अखिलेश यांनी फुंकली युतीची तुतारी; यूपीत ३८-३८ जागांचा फॉर्म्यूला

निलेश राणे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हटले आहे, की 'ज्या राज्यातून काँग्रेसचे अध्यक्ष निवडून येतात. त्याच राज्यात त्यांना सोबत घेण्याची गरज वाटत नाही. जेव्हा राहुल गांधींना पंतप्रधान होता आलं असतं तेव्हा झाले नाहीत आता काही केले तरी राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही.' भाजपने नारायण राणे यांची केंद्रीय जाहीरनामा समितीवर नेमणूक केल्यानंतर राणे कुटुंबीय काँग्रेसला लक्ष करत असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

हेही वाचा - नाशिकमध्ये आजारपणाला कंटाळून रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा आहेत. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी एकत्र येत आज ३८-३८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. तसेच काँग्रेसच्या परंपरागत रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नसल्याची घोषणा या नेत्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. भाजपाविरोधात सपा आणि बसपा एकत्र आले असले तरी त्यांनी काँग्रेसलाही समांतर अंतरावर ठेवले आहे. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी राहूल गांधीवर निशाणा साधला आहे.

हेही वाचा - 'जो तो पंतप्रधान व्हायला निघालाय', जेटलींनी उडवली महाआघाडीची खिल्ली
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES