• A
  • A
  • A
आचारसंहिता भंगप्रकरणी थेट गुन्हे दाखल करा- विभागीय आयुक्त

रत्नागिरी- आचारसंहिता भंगप्रकरणी कुणाचीही तमा न बाळगता थेट गुन्हे दाखल करा, गुन्ह्याचे स्वरुप अधिक गंभीर असेल तर अटकेची कारवाई करा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिले. ते येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक पूर्व तयारीच्या आढावाप्रसंगी बोलत होते.


यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे आदी उपस्थित होते. आचार संहिता भंगाप्रमाणेच सरकारी वा खासगी मालमत्तेचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी हे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोरपणे काम करण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
मतदारांशी पोलाईट वागा, त्यांना अचुक माहिती द्या, मतदानाच्या दिवशी कामवर असणारे कर्मचारी व पोलीस हे देखील १०० टक्के मतदानाचा हक्क कसा बजावतील ते पहा, इव्हीएम-इव्हीपॅट जनजागृत्तीमध्ये सातत्य ठेवा. C-Vigil सारखे अॅप सामान्य नागरीकांच्या हातात येणार आहे. त्याचा गैरवापरही होऊ शकतो. त्यावर आलेली तक्राराची निराकरण वेळेत करा आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या समितींचे प्रमुख, विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधकारी कार्यालय येथे Voter Help Kiosk या नाविण्यपूर्ण उपक्रमाचे शुभारंभ डॉ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. पाटील म्हणाले, जास्तीत जास्त लोकांनी आपली नावे मतदार यादीमध्ये नोंदवली पाहिजे, जास्तीत जास्त मतदारांनी मतदार केले पाहिजे. त्यासाठी ज्या सुविधा द्यायच्या आहेत, त्या जास्त प्रमाणात दिल्या तर मतदानांची टक्केवारी निश्चित वाढेल. यासाठी Voter Help Kiosk ची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेचा वापर करुन मतदारांना मतदान यादीतील नाव शोधणे, कुठल्या भागात आहे, मतदान केंद्र कोणते आहे आदी माहिती घेता येणार आहे. तसेच या मशिनला फोनही जोडलेला आहे, जो डायरेक्ट १९५० या नंबर जातो. EVM-VVPAT प्रात्यक्षिक केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले.
रेल्वे स्टेशन, रत्नागिरी येथे EVM-VVPAT बद्दल माहिती देऊन मतदारांमध्ये जनजागृत्ती करण्यासाठी व्हिडिओ वॉलचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी आचंल गोयल, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब बेलदार, प्रांतधिकारी अमित शेडगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे, रेल्वे प्रशासन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES