• A
  • A
  • A
शासकीय योजना राबविण्याचे खरे प्रशिक्षण खासदार राऊतांकडूनच मिळाले - उदय सामंत

रत्नागिरी - केंद्र सरकारच्या योजना कशा राबवाव्यात याची मला फारशी माहिती नव्हती. मात्र, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाचा मला खूप फायदा झाला असे, सांगत आमदार उदय सामंतांनी कृतज्ञता व्यक्त केली. संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक येथे नावडी पंचायत समिती गणातील शिवसेना-भाजप युतीच्या संयुक्त "निर्धार" मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.


आचारसंहिता संपल्यानंतर जनतेला अपेक्षित असलेली विकास कामे ताबडतोब सुरू केली जातील. त्यामुळे एखादे विकास काम झाले नाही, म्हणून जनतेला दुसऱया राजकीय पक्षांकडे जावे लागणार नाही, याची दक्षतादेखील माझ्याकडून घेतली जाईल. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण, बी.एस.एन.एलची टॉवर उभारणी याचे सर्व श्रेय खासदार विनायक राऊत आणि खासदार अनंत गिते यांनाच जाते. केंद्र सरकारच्या योजना कशा राबवाव्यात याची मला फारशी माहिती नव्हती. मात्र, खासदार विनायक राऊत यांनी केंद्र सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. त्यातून मला अभ्यास करता आला. याबद्दल मी खासदार विनायक राऊत यांच्यासाठी कायमस्वरुपी कृतज्ञता व्यक्त करेन, असे प्रतिपादन म्हाडा अध्यक्ष, आमदार उदय सामंत यांनी संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावातील आयोजित निर्धार मेळाव्यात केले.

हेही वाचा -सेनेत परतण्यासाठी नारायण राणेंनी अनेकवेळा पाठवले प्रस्ताव; विनायक राऊतांचा गौप्यस्फोट
या मेळाव्याला शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, उप तालुकाप्रमुख बाबू चव्हाण, चंद्रकांत किंजळे, जिल्हा परिषद सदस्या माधवी गीते, संगमेश्वर पंचायत समिती उप सभापती अजित गवाणकर, महिला तालुका संघटक स्मिताताई लाड, उपतालुका संघटक मानसी बने, विभागप्रमुख राजू साळवी, अतिश पाटणे, पंचायत समिती सदस्य वेदांगी पाटणे, महिला विभाग संघटक नम्रता सकटे, कुरधुंडा गावचे सरपंच जमुरत अलजी, शाखाप्रमुख चंद्रकांत किंजळे, हरिश्चंद्र गुरव, सल्लाहुद्दीन शेठे, दिनेश गुरव, सुहास मायंगडे, तुकाराम आंबेकर, सुरेश गुरव, रमेश मोरे, अनिस फकीर, इम्तियाज कापडी, तसेच सर्व पं. स. गणातील शिवसेनेचे उपविभागप्रमुख, सरपंच, शाखाप्रमुख, गटप्रमुख, महिला आघाडी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -विनायक राऊत नको, सुरेश प्रभूच हवेत; भाजप कार्यकर्त्यांची मागणी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES