• A
  • A
  • A
भाजपचा असहकार; राष्ट्रवादीची राणेंना मदतीची शक्यता, शिवसेनेची होणार कोंडी

रत्नागिरी - सिंधुदूर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघात आता कुरघोडीचे राजकारण रंगले आहे. स्थानिक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेशी असहकाराची भूमिका घेतल्याने शिवसेनेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यात भाजप पाठोपाठ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचीही भूमिका निर्णायक ठरणार आहे. विधान परिषद निवडणुकीवेळी राणेंनी राष्ट्रवादीच्या अनिकेत तटकरे यांना मदत केली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसही राणेंच्या मदतीला धावून जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेला हे आव्हान सोपे नसणार आहे.

निलेश राणे आणि नारायण राणे


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून निलेश राणे निवडणूक लढवणार आहेत. तर शिवसेनेकडून विद्यमान खासदार विनायक राऊत पुन्हा निवडणूक रिंगणात असणार आहेत. तर आघाडीकडून हा मतदार संघ काँग्रेसला सोडण्यात आलेला आहे. त्यामुळे काँग्रेसकडून नविनचंद्र बांदीवडेकर हे नाव सध्या समोर आलेले आहे. पण मुख्य म्हणजे कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे 6 पैकी 5 आमदार आहेत. पण गेल्या 5 वर्षांत राजकीय समीकरण बदलली आहेत.

भाजप-शिवसेनेत कमालीचा दुरावा वाढलेला आहे. त्यात शिवसेनेचे कट्टर विरोधक नारायण राणे काँग्रेस सोडून स्वतंत्र पक्ष काढून भाजपचे खासदारही बनले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही विधान परिषद निवडणुकीवेळी राणेंशी सुत जुळवले होते. त्यामुळेच भाजपची साथ शिवसेनेला मिळाली नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश राणे यांना पडद्याआडून मदत केली, तर शिवसेनेच्या विनायक राऊत यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीत नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अनिकेत तटकरे यांना पाठींबा दिला होता. त्यामुळे अनिकेत तटकरे यांचा विजय सोपा झाला होता. या निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमानीची जवळपास ९० मते राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाची ठरली होती. त्यामुळेच आता या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस राणेंनी केलेल्या उपकाराची परतफेड करू शकते. आघाडीचा उमेदवार असला तरी राष्ट्रवादी काँग्रेस आपली सर्व ताकद नारायण राणेंच्या मागे उभी करू शकते.
शिवसेनेला हे दुहेरी आव्हान जड जाऊ शकते. एकीकडे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून कोंडी आणि दुसरीकडे राष्ट्रवादीचा राणेंना छुपा पाठिंबा मिळण्याची शक्यता यामुळे शिवसेना कोंडीत सापडली जाऊ शकते.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES