• A
  • A
  • A
सेनेत परतण्यासाठी नारायण राणेंनी अनेकवेळा पाठवले प्रस्ताव; विनायक राऊतांचा गौप्यस्फोट

रत्नागिरी - शिवसेनेतून बाहेर पडलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत येण्यासाठी अनेक प्रस्ताव पाठवले होते. मात्र, एकदा झालेल्या बेईमानीला शिवसेनेच्या घरात पुन्हा प्रवेश नाही, असे म्हणत उद्धव साहेबांनी साफ नकार दिला होता, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. जिल्ह्यातील पाली येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात सध्या राजकीय खेळींना वेग आला आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान या मतदारसंघातून आघाडी राणेंना पाठिंबा देणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. याच मुद्यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर निशाणा साधला. आता नारायण राणे चौथ्या आघाडीच्या शोधात निघाले असल्याचा टोलाही राऊत यांनी यावेळी लगावला.
हेही वाचा - ज्यांच्या चिरंजीवांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनी आघाडीबाबत बोलू नये - जितेंद्र आव्हाड
नारायण राणे यांना धास्ती लागली आहे. आम्हाला कुणी घेता का? माझ्यासाठी कुणी दार उघडा का? अशी विनंती करीत राणे ठिकठिकाणी करत फिरत असल्याचेही राऊत म्हणाले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES