• A
  • A
  • A
पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत सुमित खोत राज्यात प्रथम

रत्नागिरी - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत देवरुख मधली आळी येथील सुमित कल्लाप्पा खोत याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. नागपूर येथे नोव्हेंबर २०१७ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.


हेही वाचा-महिला दिन : भाट्ये समुद्रकिनारी भव्य मानवी साखळी, महिला सक्षमीकरणाचा दिला संदेश
सुमित याचे वडील देवरुख न्यु इंग्लिश स्कुलमध्ये शिक्षक म्हणुन कार्यरत आहेत. सुमित हा देवरुख न्यु इंग्लिश स्कुलचा विद्यार्थी आहे. त्याचे १२ वी विज्ञान शाखेचे शिक्षण देवरुख येथे झाले. त्यानंतर पदवी शिक्षणासाठी त्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे प्रवेश घेतला. २०१५ मध्ये बीएससी पदवी प्राप्त करून पुढील ३ वर्षे राहुरी विद्यापीठातूनच महाराष्ट्र त्याने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.

सुमित राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर देवरुखात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व सत्यनारायण प्रासादीक मंडळातर्फे सुमितचे अभिनंदन करण्यात आले.

हेही वाचा-पाकिस्तानकडून २० वर्षे मार खाल्ल्यानंतर आपल्या एका एअर स्ट्राईकचे मार्केटिंग - अॅड. प्रकाश आंबेडकरCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES