• A
  • A
  • A
पाकिस्तानकडून २० वर्षे मार खाल्ल्यानंतर आपल्या एका एअर स्ट्राईकचे मार्केटिंग - अॅड. प्रकाश आंबेडकर

रत्नागिरी -  मागील २० वर्षे पाकिस्तानकडून मार खाल्ल्यानंतर आपण केलेल्या एका एअर स्ट्राईकचे मार्केटिंग सुरू आहे. या स्ट्राईकमुळे पाकिस्तानातील किती दहशतवादी मारले गेले हे आजही कोणाला सांगता येत नाही, असे वक्तव्य भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी रत्नागिरी येथील एका सभेत त्यांनी केले.


जागतिक स्तरावर याची चर्चा सुरू आहे. भारताला खोटा बोलणारा प्रधानमंत्री मिळाला आहे. अशा प्रधानमंत्र्याला जागतिक स्तरावर कोणीही गांभिर्याने घेणार नाही. देशाची इभ्रत वाचवायची असेल तर भाजपाला देशातुन हटवा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ­ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
रत्नागिरी शहरानजिकच्या चंपक मैदान येथे आयोजित सत्ता संपादन महामेळाव्यात प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत धनगर समाजाचे नेते अण्णाराव पाटील, कोळी समाजाचे नेते राजाराम पाटील, स्थानिक नेते सुरेश भायजे, मारूती जोशी, भारिपचे सुनिल पवार, सुमन कोळी, रत्नदीप कांबळे आदि मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीला साथ देण्यासाठी हजारो रत्नागिरीकर उपस्थित राहिले होते.

आंबेडकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय माध्यम बॉम्ब टाकल्याचे पुरावे मागत आहे. मोदी म्हणतात ३००, अमित शहा म्हणातात अडीचशे मेले. धर्मांध मतदारांना सांगतो, मोदींना पुन्हा निवडुन दिले तर या देशाला कोणीही गांभीर्याने घेणार नाही. भारतीय जतना खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवते.


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES