• A
  • A
  • A
रत्नागिरीतील ५० विद्यार्थ्यांनी पाहिली 'चांदोबा' गुरुजींची शाळा

रत्नागिरी - शहरातील शालेय विद्यार्थ्यांनी आज आकाशातील निरनिराळ्या ग्रह-ताऱ्यांची सफर केली. रत्नागिरीतल्या एसव्हीएम शाळेने विद्यार्थ्यांना ही खगोलीय दर्शनाची संधी उपलब्ध करुन दिली. मुलांना अंतराळातील ग्रह ताऱ्यांविषयी माहिती व्हावी, त्यांना विज्ञानाची गोडी लागावी म्हणून शाळेने हा उपक्रम राबविला. यात ५० हून अधिक विद्यार्थ्यांनी या अंतराळ सफरीचा आनंद घेतला.


आकाशातील अनोख्या दुनियेचे आकर्षण अनेकांना असते. चंद्र, गह तारे, आकाशगंगा आणि त्याभोवतीची दुनिया याविषयीचे प्रश्न मुलांना सतत पडत असतात. त्यामुळेच या अंतराळात नेमके काय दडले आहे, हे कळण्यासाठी एसव्हीएम शाळेने हा उपक्रम राबविला. दुर्बिणीच्या माध्यमातून रात्री खगोलीय घटनांची पर्वणी इथे मुलांनी अनुभवली.

हेही वाचा - कोकण थंडीने कुडकुडतेय...तापमानाने गाठला निचांकी आकडा

आकाशात दिसणारा चंद्र विविध तारे या मुलांनी अनुभवली. आकाशात नेहमीच आपलासा वाटणाऱ्या चांदोबा दुर्बिणीतून कसा दिसतो, त्याची काय वैशिष्टे आहेत, त्याच्या भोवती कुठले ग्रह असतात. आकाशातील चांदण्या कशा दिसतात, अशा अनेक गोष्टींचा अनुभव आकाश निरीक्षणातून मुलांनी अनुभवला.

हेही वाचा - बुरोंडी बंदरातील जेटीचा प्रश्न ऐरणीवर; जेटी नसल्याने मच्छिमारांची गैरसोय

आकाश निरिक्षण ही कला आहे. मुलांमध्ये विज्ञान आणि आकाशातील ग्रहांविषयी गोडी निर्माण व्हावी म्हणुन हा उपक्रम राबवला, असे मत शाळेच्या मुख्याध्यापिकांनी व्यक्त केले.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES