• A
  • A
  • A
बुरोंडी बंदरातील जेटीचा प्रश्न ऐरणीवर; जेटी नसल्याने मच्छिमारांची गैरसोय

रत्नागिरी - सध्या कोकणातील मच्छिमारांना समुद्रातील अंतर्गत बदलाचा फटका बसू लागला आहे. त्यामुळे मच्छिमार बांधव हैराण झाले आहेत. त्यातच जिल्ह्यात काही ठिकाणी जेटीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. दापोली तालुक्यातील बुरोंडी बंदरातही जेटी नसल्यामुळे येथील मच्छिमारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे पुन्हा जेटीची मागणी जोर धरत आहे.


मागली ५ ते ६ दिवसांपासून समुद्रात वेगाने वारे वाहत आहेत. अशातच दक्षिणेकडून अचानकपणे आलेल्या वाऱयामुळे पारंपरिक बुरोंडी बंदरातील काही बोटी भरकटल्या. समुद्रात अचानक फयाणसारखी परिस्थिती निर्माण झाल्याने मच्छिमार बांधवांचा चांगलाच गोंधळ उडाला. मात्र, स्थानिक मच्छिमारांच्या सतर्कतेमुळे भरकटलेल्या बोटी व मच्छीमारांना बाहेर काढण्यात यश आले. या वादळामुळे बोटींचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा- कोकण थंडीने कुडकुडतेय...तापमानाने गाठला निचांकी आकडा
पारंपरिक बुरोंडी बंदराला वारंवार वादळाचा फटका बसू लागल्याने बुरोंडी बंदरातील मच्छिमार बांधवांना वेळप्रसंगी आपल्या जीवाला मुकावे लागत आहे. समुद्रात वादळ झाल्यास बुरोंडी बंदरात बोटी लावण्यासाठी सुरक्षित जागा नाही. बोटी उभ्या करण्यासाठी दाभोळ किंवा हर्णे बंदरात घेऊन जावे लागते. मात्र, मध्येच वादळाने गाठल्यास मोठी हानी होत असल्याचे येथील मच्छिमार बांधवांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा जेटीची मागणी जोर धरत आहे. सरकारने आता तरी आमच्या मागणीकडे लक्ष द्यावे, अशी आर्त विनंती येथील मच्छिमार करत आहेत.
हेही वाचा- श्रीया रावराणे यांची आत्महत्या नसून घातपात; नातेवाईकांचा आरोप

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES