• A
  • A
  • A
कोकण थंडीने कुडकुडतेय...तापमानाने गाठला निचांकी आकडा

रत्नागिरी - गेल्या चार दिवसांपासून कोकणाला हुडहुडी भरली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तापमानाने निचांकी आकडा गाठला आहे. थंडीपासून बचावासाठी लोक स्वेटर, मफलर, कानटोप्यांचा वापर करत आहेत. तर, काही ठिकाणी शेकोटीची उब अनुभवत आहेत.


राज्यभर सध्या थंडीचा कडाका अचानक वाढला आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्‍त वाऱ्यांचा पुरवठा कमी झाल्याने हा थंडीचा कडाका वाढला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही १२ अंश सेल्सिअपर्यंत पारा खाली आला आहे. तर, मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख असणाऱ्या दापोलीत ४.५ अंश सेल्सिअस इतके निचांकी तापमान नोंदविले गेले. यापूर्वी दापोलीमध्ये १९९१ साली ३.४ आणि ३.७ अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर यावर्षीच तापमानाने खालचा आकडा गाठला आहे.
हेही वाचा - श्रीया रावराणे यांची आत्महत्या नसून घातपात; नातेवाईकांचा आरोप

बोचरी थंडी आणि वाऱ्यामुळे रत्नागिरीकर चांगलेच हैराण झाले आहेत. पण, थंडीमुळे कोकणचे सौंदर्य चांगलेच खुलले आहे. पहाटे पहाटे निसर्गाने पांघरलेली दाट धुक्याची चादर डोळ्यांचे पारणे फेडत आहे. मात्र, ही थंडी पुढचे काही दिवस अशीच राहिल्यास आंब्याची फळगळ वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES