• A
  • A
  • A
श्रीया रावराणे यांची आत्महत्या नसून घातपात; नातेवाईकांचा आरोप

रत्नागिरी - चिपळूण तालुक्यातील रामपूर गावच्या सरपंच श्रीया रावराणे यांच्या आत्महत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. श्रीया यांनी आत्महत्या केली नसून हा घातपात असल्याचा संशय श्रीया रावराणे यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे.

मृत श्रीया रावराणे


त्यांचा संशय श्रीया यांच्या पतीवरच आहे. याबाबत नातेवाईकांनी चिपळूण पोलिसांत तक्रार दिली असून या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा- कितीही केसेस टाकल्या तरी मला फरक पडत नाही - निलेश राणे
३ दिवसांपूर्वी आपल्या वाढदिवशीच विष प्राशन केल्याने श्रीया रावराणे यांचा मृत्यू झाला होता. मात्र, श्रीया यांनी आत्महत्या केली नसून पती धनंजयनेच घातपात केल्याचा आरोप श्रीयाच्या नातेवाईकांनी केला आहे. तिचा पती धनंजय रावराणे याने एका विवाहित महिलेबरोबर आर्थिक व्यवहार केले आहेत. मात्र, या व्यावसायिक संबंधातून त्यांच्यात अनैतिक संबंध निर्माण झाले होते. याच कारणावरून आपल्या बहिणीचा मानसिक व शारीरिक छळ होत होता, असं श्रीयाचा भाऊ प्रसाद साळवी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
या प्रेमसंबंधात अडथळा नको म्हणून पती धनंजय रावराणे यानेच श्रीयाचा घातपात केल्याचा आरोप माहेरच्या मंडळींनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून यातील गुढ उकळून काढावं अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
हेही वाचा- शीळ डोंगर परिसराला लागलेल्या वणव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक
श्रीया रावराणे या तालुक्यातील एक धडाडीच्या महिला सरपंच म्हणून ओळखल्या जात होत्या. रामपूर पंचायत समिती गणामध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूकही लढवली होती. त्यामध्ये अल्प मतांनी त्यांचा पराभव झाला होता. रामपूरच्या विकासात सरपंचपदाच्या काळात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. श्रीया ही धीट, कणखर होती. त्यामुळे तिने आत्महत्या करणे शक्यच नसल्याचे नातेवाईकांनी म्हटलं आहे.

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES