• A
  • A
  • A
कितीही केसेस टाकल्या तरी मला फरक पडत नाही - निलेश राणे

रत्नागिरी - महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस आणि माजी खासदार निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. माझ्यावर कितीही केसेस टाकल्यात तरी मला काय फरक पडणार नसल्याचे वक्तव्य करत त्यांनी सेनेला आव्हान दिले आहे. जिल्ह्यातील लांजा येथे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते.


हे ही वाचा - कोणतीही समिती आली तर, आम्ही उधळून टाकू; निलेश राणेंचा प्रहार
शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल जाहीर सभेत माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले होते. त्या
नंतर विविध पोलीस स्टेशनमध्ये निलेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर निलेश राणे यांनी आपल्या स्टाईलने यावेळी खिल्ली उडवली.

राणे म्हणाले, की बाळासाहेबांबद्दल कुणी एक शब्द बोलल्यावर अंगावर येणारी शिवसेना आज फक्त मन दुखवली म्हणून गुन्हे दाखल करत आहे. मात्र, तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा; मला फरक पडत नाही, असे उत्तर देत निलेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा टार्गेट केले आहे.
हेही वाचा -आमच्या नादाला लागाल तर ठाकरेंची अब्रु चव्हाट्यावर आणू - निलेश राणे

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES