• A
 • A
 • A
बारावीच्या परीक्षेला ३२ हजार ३७३ विद्यार्थी, गैरप्रकार रोखण्यासाठी नियमांत बदल

रत्नागिरी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यावर्षी कोकण विभागातून ३२ हजार ३७३ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा गैरप्रकार व कॉपीमुक्त व्हावी यासाठी नियमावलीमध्ये मंडळाकडून बदल करण्यात आला आहे.


हेही वाचा - शीळ डोंगर परिसराला लागलेल्या वणव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक
बारावीच्या परीक्षेसाठी २० परीरक्षक केंद्र असून यामध्ये रत्नागिरीमध्ये १२ केंद्र तर सिंधुदुर्गमध्ये ८ परीरक्षक केंद्र आहेत. कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी ७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

परीक्षांच्या नियमांत झालेले बदल

आतापर्यंत कस्टोडियनमार्फत प्रश्नपत्रिकांचे सीलबंद गठ्ठे केंद्र संचालकांच्या ताब्यात दिले जात होते. केंद्र संचालकांच्या आदेशानुसार परीक्षा केंद्रात एका रुममध्ये ते गठ्ठे फोडले जात होते. त्यानंतर परीक्षेच्या वर्गावर नेमलेल्या पर्यवेक्षकांना प्रश्नपत्रिकांचे वाटप केले जात होते. यावर्षी यामध्ये बदल करण्यात आला आहे.

हेही वाचा - ईनाडू इंडिया इम्पॅक्ट: बांबूच्या टेकूवरील वीजेचे खांब महावितरणने बदलले
केंद्र संचालक हे प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिटे पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपुर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिट पर्यवेक्षकांना देतील. परीक्षेपुर्वी काही मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकिट २ परीक्षार्थींच्या स्वाक्षरीने फोडले जाणार आहे. यामुळे पेपर फुटण्यासारखे गैरप्रकार होणार नाहीत. तर, कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी आसन व्यवस्थेमध्येही बदल करण्यात आले आहेत. यासाठी जास्तीत जास्त वर्ग असलेली महाविद्यालये परीक्षांसाठी निवडली जाणार आहेत. त्यामुळे कमी विद्यार्थी संख्या असल्याने परीक्षेवेळी होणारे कॉपीचे प्रकार कमी होणार आहे.

हेही वाचा - गणपतीपुळेच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी, तब्बल ९१ कोटींचा निधी मंजुर
रत्नागिरी जिल्हा
 • महाविद्यालये - १५५
 • परीक्षा केंद्रे - ३७
 • विज्ञान शाखा विद्यार्थी - ५ हजार ५८६
 • कला शाखा विद्यार्थी - ६ हजार २५८
 • विद्यार्थी संख्या - २१ हजार १४७
 • वाणिज्य शाखा विद्यार्थी - ८ हजार ६७०
 • एमसीव्हीसी विद्यार्थी - ६३३
 • एकूण विद्यार्थी संख्या - २१ हजार १४७

सिंधूदुर्ग जिल्हा
 • महाविद्यालये - ९५
 • परीक्षा केंद्रे - २३
 • विज्ञान शाखा विद्यार्थी - २ हजार ८९५
 • कला शाखा विद्यार्थी - २ हजार ६९३
 • वाणिज्य शाखा विद्यार्थी - ४ हजार ६२७
 • एमसीव्हीसी - १ हजार ११
 • एकूण विद्यार्थी - ११ हजार २२६

हेही वाचा - पालकमंत्री वायकर यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्‌यात ४३ विहिरींना मंजुरी

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES