• A
  • A
  • A
शीळ डोंगर परिसराला लागलेल्या वणव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील शीळ डोंगर  परिसराला लागलेल्या वणव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली. २ दिवस हा वणवा सुरू होता. या वणव्यात मोठ्या प्रमाणात आंबा, काजू वनसंपत्ती जळून खाक झाली.


डोंगर सड्यावर सुकलेले गवत आणि सोसाट्याचा वारा यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. सुकलेले गवत वेगाने पेटल्याने संपूर्ण परिसर आगीने व्यापून गेला. २ दिवस ही आग धुमसत होती. अखेर गुरुवारी रात्री आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

हेही वाचा- ईनाडू इंडिया इम्पॅक्ट: बांबूच्या टेकूवरील वीजेचे खांब महावितरणने बदलले
याठिकाणी दरवर्षी आग लागते आणि यात लाखोंचे नुकसान होते. त्यामुळे अलीकडच्या काळात कोकणात लागणारे हे वणवे लागतात की लावले जातात याचा शोध घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा-गणपतीपुळेच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी, तब्बल ९१ कोटींचा निधी मंजुर

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.