• A
  • A
  • A
ईनाडू इंडिया इम्पॅक्ट: बांबूच्या टेकूवरील वीजेचे खांब महावितरणने बदलले

रत्नागिरी - जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील आंगले गावात महावितरणने गंजेलेल्या वीजेच्या खांबाना चक्क बांबूचा आधार देऊन ते उभे ठेवले होते. याबाबतचे वृत्त 'ईनाडू इंडिया'ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महावितरणने टेकू दिलेले सर्व खांब बदलले आहेत.


हेही वाचा - गंजलेल्या विजेच्या खांबांना बांबूचा टेकू; राजापूर तालुक्यातील आंगले गावातील प्रकार
कोणत्या ना कोणत्या कारणाने महावितरण नेहमीच चर्चेत असते. महावितरणच्या अशाच एका अजब कारभाराचा नमुना ईनाडू इंडियाने बातमीच्या माध्यमातून पुढे आणला होता. राजापूर तालुक्यातील आंगले गावातले विजेचे अनेक खांब गंजलेले होते. लोकांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या. मात्र, या खांबांना बदलण्याऐवजी त्यांना चक्क बांबूचा आधार देत महावितरण वेळ मारून नेत होती. बांबूच्या आधारावर उभ्या असलेल्या खांबांच्याद्वारे गावात लाईट दिला जात होता. मागील सहा महिन्यांपासून महावितरणचा असाच कारभार सुरू होता. बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर गावातील सर्व खांब बदलण्यात आलेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा- आमच्या नादाला लागाल तर ठाकरेंची अब्रु चव्हाट्यावर आणू - निलेश राणे




CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES