• A
  • A
  • A
गणपतीपुळेच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी, तब्बल ९१ कोटींचा निधी मंजुर

रत्नागिरी - श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्राच्या ९१ कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जुन्या आराखड्यातील त्रुटी काढून नवीन आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्यानंतर ६ महिन्यातच या विकास आराखड्याला मंजूरी मिळाली आहे.


हेही वाचा - 'नाणार' प्रकल्पग्रस्तांची आक्रमकता, सुखथनकर समितीने गुंडाळला गाशा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीत शिखर समितीने तब्बल ९१ कोटीच्या गणपतीपुळे आराखड्यास मान्यता दिली. यामध्ये रस्ते ४० कोटी, पाणीपुरवठा २३ कोटी, सांडपाणी प्रकिया ११ कोटी, घनकचरा व्यवस्थापन ४.५० कोटी, पार्कींग व्यवस्थेसाठी १.५० कोटी आणि सुशोभिकरणाला ११ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

हेही वाचा - ट्रक टर्मिनल्सचे काम स्थगित करा, अन्यथा ११ फेब्रुवारीपासून बेमुदत संप

या बैठकीला मुख्यमंत्री यांच्यासमवेत वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, पालकमंत्री रविंद्र वायकर, गृहराज्यमंत्री दिपक केसरकर, अपर मुख्य सचिव मदान, भूषण गगरानी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आदी उपस्थित होते.

हेही वाचा - 'राजीव कुमार हाजिर हो!' सीबीआय न्यायालयासमोर चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

मागील वर्षी रत्नागिरीचे तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी अपूर्ण ७९ कोटीचा आराखडा तयार केला होता. त्यामुळे म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी स्थानिकांना विश्वासात घेवून या आराखड्याची रचना बदलली आणि नवीन परिपूर्ण असा ९१ कोटीचा आराखडा तयार केला. या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता गणपतीपुळे पर्यटन क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर वाटचाल करणार असून यामध्ये म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.
CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES