• A
  • A
  • A
ट्रक टर्मिनल्सचे काम स्थगित करा, अन्यथा ११ फेब्रुवारीपासून बेमुदत संप

रत्नागिरी - नगर परिषदेच्या बहुचर्चित ट्रक टर्मिनल्सचे काम स्थगित करावे. अन्यथा ११ फेब्रुवारीपासून बेमुदत संप करणार संप करणार असल्याचा इशारा जिल्हा मोटर मालक असोसिएशनने जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे दिला आहे.हेही वाचा - पालकमंत्री वायकर यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्‌यात ४३ विहिरींना मंजुरी
रत्नागिरी नगर पालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत शिवसेना, राष्ट्रवादी, भाजपा सर्वच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने ट्रक टर्मिनसच्या कामाला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. ट्रक टर्मिनल्स आरक्षण विकसित करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांनी विकासकाला दिलेली निवासी व वाणिज्य इमारत बांधकाम परवानगी तत्काळ स्थगित करा असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. मात्र, मुख्याधिकारी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.


हेही वाचा -७ अजगरांना मारुन जमिनीत पुरले; ४ जणांना अटक, आरोपींकडून गुन्हा कबूल

रत्नागिरी शहरात शासनाने आरक्षण क्र. ११७ हे ट्रक टर्मिनल्ससाठी रत्नागिरी - कोल्हापूर मुख्य रस्त्याला ठेवले आहे. ते आरक्षण विकसित करताना मोटार मालक संघाला व ट्रक चालक, मालक, क्लीनर, हमाल या लोकांसाठी आवश्यक असणा-या सेवासुविधा व बाधकाम क्षेत्र अशा सर्व गोष्टी शासन निर्णयाप्रमाणे होणे गरजेचे होते. टर्मिनल्सचा आराखडा नियमबाह्य आहे. मिऱ्या भगवती रोडवर टर्मिनल्सचे प्रवेशद्वारे दाखवून मोटार मालक संघाला किंवा त्यांच्या सर्व सभासदांना त्याचा काहीच उपयोग होणार नाही. टर्मिनसमध्ये निवास व्यवस्था, टॉयलेट व बाथरुमची व्यवस्था तुटपूंजी आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.

निवेदनात काय आहे -
मुख्याधिकाऱ्यांनी टर्मिनल्सच्या रेखांकनाला दिलेली परवानगी तत्काळ रद्द करावी. तसे न झाल्यास मोटार मालक संघाने संपाची हाक दिली आहे. यामध्ये रत्नागिरीकरांची जी गैरसोय होणार आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार मुख्याधिकारी राहतील असे निवेदनात नमुद केले आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES