• A
  • A
  • A
पालकमंत्री वायकर यांच्याकडून रत्नागिरी जिल्ह्‌यात ४३ विहिरींना मंजुरी

रत्नागिरी - जिल्ह्‌यातील विविध तालुक्यांना भेडसावणारा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी २०१८-१९ मध्ये एकूण ४३ विहीरींना मान्यता दिली आहे. यासाठी लागणाऱ्या ३ कोटी २७ लाख रकमेलाही मंजुरी दिली आहे.


हेही वाचा - झाडातून बाहेर पडले चक्क नळासारखे पाणी, व्हिडिओ व्हायरल
पिण्याच्या पाण्यासाठी रहिवाशांची होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी रवींद्र वायकर यांनी २०१७-१८ मध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये एकुण ५६ विहिरींना मंजुरी दिली होती. त्यानंतर आता २०१८ -१९ मध्येही त्यांनी विविध तालुक्यांतील जनतेच्या मागणीनुसार तसेच उपलब्ध निधीनुसार नाविन्यपुर्ण योजनेतून ४३ विहिरींना मंजुरी दिली आहे. त्यासाठी आवश्यक रुपये ३ कोटी २७ लाख इतक्या निधीलाही मान्यता दिली आहे. यात मंडणगड (४), दापोली (१०), खेड (२), गुहागर (६), चिपळुण (५), राजापूर (६), संगमेश्वर (६), रत्नागिरी (३) व लांझा (१) येथील विहीरींचा समावेश आहे. यामुळे विविध तालुक्यांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटण्यास काही प्रमाणात मदत होणार आहे.
हेही वाचा - नाणार प्रकरणी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल; पोलिसांचा चोख बंदोबस्त

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES