• A
  • A
  • A
झाडातून बाहेर पडले चक्क नळासारखे पाणी, व्हिडिओ व्हायरल

रत्नागिरी - झाडातून पाणी वाहणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूखजवळच्या पूर गावातील आहे. कवळ तोडलेल्या ऐनाच्या झाडातून हे पाणी बाहेर येत होते. अर्ध्या तासाहून अधिक वेळ या झाडातून पाणी बाहेर पडत होते. दरम्यान, झाडातून पाणी वाहत असल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.


हेही वाचा-'नाणार' प्रकल्पग्रस्तांची आक्रमकता, सुखथनकर समितीने गुंडाळला गाशा
सध्या जिल्ह्यात कवळ तोडणी सुरू आहे. देवरुख नजीकच्या पूर गावातही एका ऐनाच्या झाडाचे कवळ तोडण्यात आले होते. मात्र, या झाडातून २ दिवसांपूर्वी अचानक नळासारखे पाणी बाहेर पडत असल्याचे दिसले. काही लोकांनी याचा व्हिडिओ केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला.
झाडातून पाणी येण्यामागील वैज्ञानिक सत्य-
याबाबत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील वनस्पती शास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापिका एम.एम. पटवर्धन यांना विचारले असता, त्यांनी ही कोणतीही अंधश्रद्धा नाही, झाडाला पाण्याची आवश्यकता असते, त्यासाठी झाडे मुळातून पाणी घेते. त्यानंतर ते पाणी वरपर्यंत झाडाच्या सर्व भागांना पोहचवले जाते. त्यामुळे आपण जर झाडाला कोठे छेद दिला, तर त्या झाडाची जलवाहिनी तुटते आणि पाणी बाहेर येते. या व्हिडिओत दिसणारे झाड हे ऐनाचे आहे. या झाडामध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे जास्त पाणी बाहेर पडले असावे, असे पटवर्धन यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा-नाणार प्रकरणी सुकथनकर समिती रत्नागिरीत दाखल; पोलिसांचा चोख बंदोबस्तCLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES