• A
  • A
  • A
रामदास कदमांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा, सूर्यकांत दळवींचे प्रत्युत्तर

रत्नागिरी - कोकणात आता निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०१९ ची विधानसभा घोषित होण्याआधीच कोकणात शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. पर्यावरणमंत्री रामदास कदम व शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यात जोरदार वाद पेटले आहेत.


हेही वाचा - ...तर कोकणातल्या दांड्याने सुखथनकर समितीची पाठ काढू, खासदार विनायक राऊत यांचा इशारा
रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघामधून आगामी निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत, मात्र त्यांना तेथील शिवसेनेचे माजी आमदार सुर्यकांत दळवी यांचा विरोध आहे. आतापासून दोघांचे एकमेकाविरूद्ध आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. नुकतेच रामदास कदम यांनी माजी आमदार सुर्यकांत दळवी यांच्यावर आरोप करत म्हणाले 'मी त्यांना निवडणुकीत ५० हजार देत होतो, त्यांना गाडीही मिळवून दिली होती' असा गौप्यस्फोट केला होता. त्यांच्या या टीकेला माजी आमदार सुर्यकांत दळवी यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले रामदास कदम हे बिनबुडाचे आरोप करत खोटे बोलत आहेत. त्यांना खोटे बोलण्याचा पुरस्कार द्यायला हवा, अशी टीका दळवी यांनी केली आहे. तसेच रामदास कदम यांना प्रथम मीच राजकारणात संधी दिली, असे सांगून या निवडणुकीत आम्ही हे पार्सल पुन्हा कांदिवलीला पाठवणार असल्याची टीका दळवी यांनी केली. तसेच जर त्यांना निवडणूक लढवायची असेल तर त्यांनी गुहागरमधून लढवावी, असा टोला दळवी यांनी रामदास कदम यांना लगावला.

हेही वाचा - रत्नागिरीत तब्बल ७ अजगरांना मारले, पुरावा नष्ट करण्यासाठी एकाच ठिकाणी जाळले

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES