LATEST NEWS:
रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील प्रस्तावित नाणार ऑईल रिफायनरी प्रकल्पासाठी नेमलेल्या सुखथनकर समितीच्या दौऱ्यावरून शिवसेना आक्रमक झाली आहे. कंपनीची दलाली करण्यासाठी ही समिती येणार असेल, तर कोकणातल्या दांड्यानी सुखथनकर समितीची पाठ काढू, असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी दिला आहे. नाणारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी इंगळेवाडीतील अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला.