• A
  • A
  • A
खेडमध्ये गोहत्या झाल्याचा प्रकार उघड, ३ जणांना अटक

रत्नागिरी - खेड तालुक्यातील पीरलोट-धामणदिवी परिसरात गोहत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असून, ३ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे


हेही वाचा -अमरावतीत कत्तलीसाठी आणलेल्या १३२ गाईंना पोलिसांकडून जीवनदान
खेड तालुक्यातील पिरलोटे येथे २६ जानेवारीला गो-वंश हत्येच्या संशयावरून शेकडोंचा जमाव आणि पोलीस यांच्यात धुमश्चक्री उडाली होती. यावेळी जमावाकडून पोलिसांना मारहाण करण्यात आली होती. तसेच वाहनांची जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी ३०० जणांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकारानंतर त्याचे संतप्त पडसाद सर्वत्र उमटले होते.
यानंतर पोलिसांनी तपासात गती आणली होती. धामणदेवमधल्या जंगलभागात गोहत्या होत असल्याचा संशय गावातील लोकांना येत होता. त्यानुसार २५ जानेवारीला तुषार गोवळकर, संकेत हुमणे, प्रशांत चाळके हे रात्रीच्या वेळी परिसरात फिरत असताना त्यांना ५ संशयित व्यक्ती स्कॉर्पिओ गाडीसह त्यांना दिसून आले होते. यावेळी हे ५ लोक बंदुकीचा धाक दाखवून तेथून फरार झाले होते. ज्या ठिकाणी स्कॉर्पिओसह व्यक्ती संशयास्पदरित्या दिसून आले होते, त्या परिसराची ग्रामस्थांनी पाहणी केली असता त्यांना तेथे १ बैल १ गाय बांधून ठेवण्यात आली असल्याचे आढळून आले.

हेही वाचा - मध्य प्रदेशात अतिथंडीमुळे १८ गाईंचा मृत्यू

हा गोहत्येचा प्रकार आहे हे लक्षात आल्यानंत तुषार शांताराम गोवळकर यांच्यासह ग्रामस्थांनी याबाबत खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा (सुधारणा कायदा) २०१५ चे कलम ५ (अ), (ब), ८ सह भारतीय हत्यार अधिनियम कलम ३२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तपास सुरू असतानाच पोलिसांनी शमशुद्दीन इस्माईल खेरडकर (वय, ३० रा. खेर्डी मोहल्ला चीपळूण), पांडुरंग जयराम कदम (वय, ५० देऊळवाडी आवाशी) व संतोष लक्ष्‍मण गमरे (वय, ४८ रा. आवाशी बौद्धवाडी) हे या प्रकरणातील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यातील संशयित शमशुद्दीन हा गावोगावी जावून गुरे जमा करायचा अथवा कमी किंमतीत विकत घ्यायचा. ही गुरे संतोष गमरे यांच्या वाहनाने पांडुरंग कदम यांच्या गोठ्यात एकत्र ठेवली जायची. या गोट्यातून गुरे कत्तल करण्यासाठी पुढे घेऊन जाणारे पथक वेगळे होते. दरम्यान, घटनास्थळी आढळेलेल्या बैलाची ओळख पटली असून तो बैल वनिता शाहू अमरे (रा. शेल्डी खालचीवाडी) यांचा असल्याचे स्पष्ट झाले आहे.


हेही वाचा - ३१ गोवंशाना जीवदान; कोतवाली पोलिसांची कारवाई

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES