• A
  • A
  • A
रत्नागिरीच्या हर्णे-वाघवे परिसरात वनवा; लाखोंची वनसंपदा जळून खाक

रत्नागिरी - दापोली तालुक्यातील हर्णे-वाघवे परिसरात लागलेल्या वनव्यात लाखोंची वनसंपदा जळून खाक झाली आहे. शुक्रवारी लागलेला वणवा शनिवारी सकाळीदेखील आटोक्यात आलेला नव्हता.


जिल्ह्यात सध्या वणवे लागण्याच्या घटना सुरूच आहेत. गुहागर, चिपळूण पाठोपाठ दापोलीतही वणव्यांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. या वनव्यांमध्ये जंगली वनसंपदा व वन्यप्राण्यांचे मोठे नुकसान होत आहे. दापोली तालुक्यातील हर्णे-वाघवे परिसरातही शुक्रवारी असाच एक मोठा वणवा लागला. शनिवारी सकाळपर्यंत हा वणवा आटोक्यात आला नव्हता. या वणव्यात आंबा-काजूची झाडे जळून नष्ट झाली आहेत. त्याचबरोबर या वनव्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदाही जळून खाक झाली आहे.
हेही वाचा - वाकेड घाटात निवारा शेडवर कंटेनर पलटला, महामार्गाचे काम करणारा कामगार जागीच ठार
सध्या शेतकऱ्यांची आंबा-काजूंची कलमे मोहरली आहेत. काही ठिकाणी पीकही आले आहे. पण वणव्यात ही झाडे जळून खाक झाल्याने हाता-तोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

हेही वाचा - अर्थसंकल्पावर कोकणातील आंबा बागायतदार नाराज

CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES