• A
  • A
  • A
रोहा धाटाव औद्यगिक वसाहतीत सॅम्पट्रान्स कंपनीत आग, लाखोंचे नुकसान

रायगड - रोहा धाटाव औद्योगिक वसाहतीत असलेल्या सॅम्पट्रान्स कंपनीला आग लागल्याची घटना घडली. आगीची घटना कळताच रोहा एमआयडीसीच्या अग्निशामक दलांना घटनास्थळी पाचारण केले असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत कोणती जीवितहानी झालेली नाही. मात्र, कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे.


हेही वाचा - गडकिल्ल्यांच्या संवर्धनांसाठी 'अभिमान महाराष्ट्र' योजना - जयकुमार रावत
रोहा औद्योगिक क्षेत्रात सॅम्पट्रान्स ही रबराचे उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीत सकाळी ८ च्या सुमारास कंपनीतील रबरला अचानक आग लागली. कंपनीतील रबराला आग लागल्यानंतर आगीच्या ज्वाला उसळल्या असून धुरांचे लोण परिसरात पसरले होते. आग लागल्यानंतर कंपनीतील कामगारांनी कंपनीबाहेर धाव घेतली. आगीचे वृत्त कळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रबर असल्याने आग विझविण्यास वेळ लागत आहे.
हेही वाचा - ..तर मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर डान्सबार सुरू करावा - तृप्ती देसाई
ही आग ही नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळलेले नाही. मात्र, या आगीत कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीमुळे पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्रातील कामगारांचा व नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES