• A
  • A
  • A
गडकिल्ल्यांच्या संवर्धनांसाठी 'अभिमान महाराष्ट्र' योजना - जयकुमार रावल

रायगड - राज्‍यातील गडकिल्‍ल्‍यांच्‍या संवर्धनाच्‍या दृष्‍टीने एक चळवळ उभी रहावी या हेतूने  सोमवारी किल्ले रायगडावर दुर्ग परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडकिल्‍ल्‍यांच्‍या संवर्धनासाठी रोजगार हमीच्‍या माध्‍यमातून अभिमान महाराष्‍ट्राचा या योजनेची घोषणा पर्यटन व रोजगार हमी खात्‍याचे मंत्री जयकुमार रावल यांनी केली.


या वेळी किल्‍ले रायगड विकास प्राधिकरणाचे अध्‍यक्ष खासदार युवराज छत्रपती संभाजीराजे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी, सांस्कृतीक विभागाचे सचिव भुषण गगराणी यांच्यासह वनविभाग, पुरातत्व विभाग, रायगड विकास प्राधिकरण आणि महसुल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा - रायगडावर एक दिवसीय 'दुर्ग परिषद', किल्ल्यांच्या संवर्धनासाठी केंद्राकडून १०० कोटी मिळणार
महाराष्ट्रातील तीनशे नोंदणीकृत किल्ल्यांवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन काम करण्यासाठी अभिमान महाराष्ट्राचा ही योजना रोजगार हमी व पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी जाहीर केली. या माध्यमातुन एकाच वेळी महाराष्ट्रातील तीनशे किल्ल्यांवर रोजगार हमीच्‍या माध्‍यमातून गड संवर्धनाचे काम केले जाणार आहे. यातून गड संवर्धनाबरोबरच रोजगराचीही निर्मिती होईल, असे रावल यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - तोट्यात जाणाऱ्या भातशेतीला पर्याय; तरुण शेतकऱ्याने महाडमध्ये पिकवली स्ट्रॉबेरी
प्रश्‍नोत्‍तरे आणि खुली चर्चा अशा स्वरूपात दोन सत्रांमध्‍ये ही परीषद घेण्यात आली. संयुक्‍त समितीच्‍या माध्‍यमातून किल्ले पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटक आणि शिवप्रेमींची नोंद करणे, दुर्गसंरक्षक म्हणुन स्थानिक दुर्ग संवर्धन संस्थांची नेमणुक करणे, मानधन तत्‍वावर प्रत्येक गडावर गडपाल नियुक्ती करणे, फोर्ट फेडरेशन स्थापन करून सर्व संस्थांना एका छताखाली आणुन संवर्धनासाठी प्रयत्न करणे आदी प्रश्न या वेळी हाताळण्यात आले. खुल्या चर्चेचे वेळी रोपवे वर नियंत्रण, खासगी मालकीतील ऐतिहासिक वास्तुंचे संवर्धन, गडकिल्ल्यांवरील वणवे, तेथील अनधिकृत बांधकामांसाठी समिती, प्रत्येक गडकिल्ल्यांवर प्लास्टीक बंदी या विषयांवर चर्चा करण्यात आली.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES