• A
  • A
  • A
तोट्यात जाणाऱ्या भातशेतीला पर्याय; तरुण शेतकऱ्याने महाडमध्ये पिकवली स्ट्रॉबेरी

रायगड - थंडीचा हंगाम हा महाबळेश्वरमधील पर्यटनाचा हंगाम आहे. महाबळेश्वर म्हटले, की गुलाबी थंडी आणि लालचुटूकदार स्ट्रॉबेरी ही सर्वांच्याच डोळ्यासमोर येते. महाबळेश्वरची खासियत असलेल्या स्ट्रॉबेरीचे पिक महाडमधील गणेश खांबे या तरुण शेतकऱ्याने घेतले आहे. त्यांनी या शेतीतून अडीच लाखाचे उत्पन्न कमावले आहे. त्यामुळे रायगडातही स्ट्रॉबेरी फळांचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केल्यास त्यांच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होऊ शकते.


हेही वाचा-महिलेवर अत्याचार करणाऱ्या शेकापच्या उपाध्यक्षाला अटक, इतर महिलांचीही फसवणूक करत असल्याची शक्यता
महाडमधील शेतकरी गणेश खांबे यांची २ एकर शेती आहे. पिढ्यानपिढ्या ते पारंपारिक पध्दतीने भातशेती करत आहेत, पण या भातशेतीमधून मेहनत, खर्च याचा विचार करता त्यांना हवे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याचे गणेश यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी यावर्षी पावसाळ्यात भातशेती न करता स्ट्रॅाबेरीचे पिक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी प्रयोग म्हणून १ एकरावर स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्याचे ठरवले.
महाबळेश्वरपासून महाड हे जवळच्या अंतरावर असल्याने थंडीत येथील वातावरण स्टॉबेरीला पोषक आहे. त्यामुळे गणेश खांबे यांनी महाड कृषि साहाय्यक आकाश रुपनर याच्याशी संपर्क करून याबाबत माहिती घेतली. याबाबत कृषी साहाय्यक यांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून स्ट्रॅाबेरी शेतीसाठी तांत्रिक मदत दिली. गणेश यांच्या या प्रयोगाला चांगले फळ आले आहे. आज त्यांच्या शेतात लालचुटुक स्ट्रॉबेरी लागली आहे आहेत.

भातशेतीमध्ये २७ ते २८ हजार खर्च करूनही उत्पन्न मात्र १५ हजारांपर्यंत मिळत होते. मात्र, स्ट्रॉबेरीच्या शेतीतून गणेश यांना अडीच लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे शेतकरी गणेश खांबे यांच्या स्ट्रॉबेरी शेतीची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. त्यांच्या या प्रयोगाने इतर शेतकऱ्यांनीही स्ट्रॉबेरीची शेती केल्यास महाडसुद्धा स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध होऊ शकते.

हेही वाचा-..तर मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर डान्सबार सुरू करावा - तृप्ती देसाई


CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES