• A
  • A
  • A
महिलेवर अत्याचार करणाऱ्या शेकापच्या उपाध्यक्षाला अटक, इतर महिलांचीही फसवणूक करत असल्याची शक्यता

पनवेल - महिलेला नोकरीला लावतो, असे सांगुन तिच्यावर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला पनवेलमधील ऊलवे येथून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव श्रीराग कमलासनन असून, तो शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी आहे. इतर महिलांचीही त्याने अशीच फसवणूक केली असल्याची शक्यता सांगितली जात आहे. पनवेलमधील महिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध नोंदवला आहे.

आरोपी श्रीराग कमलासनन


श्रीराग कमलासनन हा मूळचा केरळचा आहे. काही वर्षांपूर्वी तो ऊलवे येथे राहायला आला. येथे आल्यावर त्याने आपला जम बसवला. आपण सामाजिक कार्य करीत असल्याचे तो सगळ्यांना भासवत होता. त्याच जोरावर तो शेतकरी कामगार पक्षाचा पदाधिकारी बनला. पनवेलच्या ऊलवे येथे त्याने स्वतःचे ऑफिस घेतले व तेथे बसून तो आपले काम करत असे.
पीडित महिला ही नेरूळ येथे एका ऑफिसमध्ये कामाला होती. तिथे श्रीराग कमलासनान याचे येणे जाणे होते. त्याच्या बरोबर महिलेची ओळख झाली. कमलासनन ह्याने तिला नोकरीचे आमिष दाखवून आपल्या ऑफीसमध्ये बोलावून घेतले. तिला आपल्या ऑफिस मध्येच कामाला ठेवले. तिचा विश्वास संपादन केला आणि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला.

हेही वाचा - आबा असते तर डान्सबारविरोधी आंदोलन करण्याची वेळच आली नसती - स्मिता पाटील

महिलेचे तिच्या नवऱ्याबरोबर पटत नसल्यामुळे न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरु होते. या गोष्टीचा फायदा घेऊन कमलासनान याने तिच्याशी संबंध प्रस्थापीत केले. तसेच, तिला लग्नाचे आश्वासनही दिले. पण, तो लग्न करणार नसल्याचे काही दिवसातच महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने त्याच्या ऑफीसमधील काम सोडून दिले.
पण, कमलासनन तिच्या घरी जावून तिला मारहाण करू लागला. तू माझ्याशी सबंध ठेवले नाहीस, तर तूझ्या बरोबर सबंध ठेवले आहेत त्याचे व्हिडिओ शूटिंग सगळीकडे व्हायरल करीन, अशी धमकी देऊ लागला. यासाठी त्याने तिच्याकडून पैशांची मागणीही केली. आतापर्यंत त्याने तिच्याकडून 1,50,000 रुपये उकळले असून, त्याची पैशाची मागणी सुरूच होती. पैसे दिले नाहीस तर तूझ्या मुलाचे अपहरण करीन, अशी धमकीही त्याने दिली होती.

या गोष्टीला घाबरून महिलेने एनआरआय पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलीसांनी कमलासनान याला अटक केली. त्याची सखोल चौकशी केली असता, त्याच्या मोबाईल आणि संगणकामध्ये दहा ते बारा मुलींचे नग्न फोटो आणि व्हिडिओ शूटिंग मिळाले. यावरून त्याचे बऱ्याच महीलांबरोबर शारीरिक सबंध असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यांना सुध्दा याने खोटे सांगुन फसवले आहे का? याचा शोध एनआरआय पोलीस करत आहेत.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES