• A
  • A
  • A
..तर मुख्यमंत्र्यांनी 'वर्षा'वर डान्सबार सुरू करावा - तृप्ती देसाई

रायगड - डान्सबार सुरू करण्यात काही आक्षेपार्ह वाटत नसेल तर, सर्वात आधी वर्षा बंगल्यावर सुरू करा, असे वक्तव्य करून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. पनवेलमध्ये नुकतीच डान्सबारविरोधी निषेध सभा पार पडली. यावेळी त्यांनी डान्सबारवरील बंदी उठवल्याच्या निर्णयाबाबत निषेध नोंदवला.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई


लेडीज डान्सबार महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी राज्यातील सामाजिक क्षेत्रातील रणरागिणींची तोफ येत्या अधिवेशनात धडकणार आहे. 'डान्सबार बंद करा, नाहीतर घरी जा', 'देवेंद्र फडणवीस होश मे आओ', अशा ब्रीदवाक्याखाली आर. आर. आबांच्या कन्या स्मिता पाटील, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई, ज्येष्ठ सामाजिक नेत्या कल्पना इनामदार आणि कर्जतचे आ. सुरेश लाड यांच्या कन्या अॅड. प्रतिक्षा लाड या रणरागिणी एकत्र येणार आहेत.
हेही वाचा - विधवा महिलांनो, हळदी-कुंकू लावून बाहेर पडा; तृप्ती देसाईंचे आवाहन
डान्सबारमध्ये पैसे उधळण्याचे व्यसन लागल्यामुळे राज्यातील लाखो महिलांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याची दखल घेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंदी कायदा केला. मात्र, डान्सबारवरील बंदी उठवुन राज्यात भाजप सरकारला लोकांचे संसार उध्वस्त करण्याचा अधिकार नाही, असे देखील भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई म्हणाल्या.
हेही वाचा- बलात्काराचे आरोप करणारी पीडिता भूमाता बिग्रेडची नाही - तृप्ती देसाई
हेच का ते अच्छे दिन? असा खोचक सवाल देखील यावेळी तृप्ती देसाई यांनी विचारला. जेव्हा आपण लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून याविरोधात आवाज उठवतो, त्यावेळी पैसे देऊन लोकांना घरी पाठवण्याची ताकद या माफियांमध्ये असते. जर सरकारने डान्सबारवरील बंदी कायम ठेवली नाही तर मी प्रत्येक डान्सबारमध्ये जाऊन ते डान्सबार बंद करायला मागे पुढे विचार करणार नाही, असा इशारा देखील यावेळी तृप्तीताई देसाई यांनी दिला.CLOSE COMMENT

ADD COMMENT

To read stories offline: Download Eenaduindia app.

SECTIONS:

  मुख्‍य पान

  राज्य

  देश

  विदेश

  व्‍यापार

  गुन्‍हेवृत्त

  क्रीडा

  मनोरंजन

  इंद्रधनू

  मैत्रिण

  फोटो आणि व्हिडिओ

  भ्रमंती

  ગુજરાતી ન્યૂઝ

  اردو خبریں

  MAJOR CITIES